धाराशिव

Dharashiv Bribe News : तीन हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा निमतानदार जाळ्यात

•तीन हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद, छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशिव युनिटची कारवाई

धाराशिव :- उपजिल्हाधीक्षक भूमी अभिलेखन कळंब, जिल्हा धाराशिव येथील शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना कळंब उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार राजू गंगाराम काळे (54 वय रा. अंबड रोड, जालना) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी पकडले.

पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव (छत्रपती संभाजी नगर, एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (एसीबी पथक धाराशिव) सिद्धाराम म्हात्रे आणि सापळा अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम (एसीबी पथक धाराशिव) यांनी कारवाई करत लाचखोर निमतानदार यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात कळंब पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार अधिनियमन 1988 अन्वये कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे नावे असलेल्या शेत जमीन गट न. 239 मधील शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करणे बाबत उप अधिक्षक भूमी अभिलेख कळंब (जिल्हा धाराशिव) यांचे कार्यालयात अर्ज दिला होता. त्यावरून तक्रारदार यांचे शेत जमिनीची मोजणी दिनांक 8 मे रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार (लोकसेवक) काळे यांनी केली. त्यानंतर हद्द कायमच्या खुणा करण्यासाठी लोकसेवक काळे हे तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाच मागणी करत असलेबाबत 8 मे रोजी तक्रारदार यांनी समक्ष ला प्र वि धाराशिव येथे येवुन तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार (9मे) रोजी काळे यांची शिवाजी चौक कळंब येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता काळे यांनी तक्रारदार यांचे शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी पंचासमक्ष पाच हजार रुपयेची लाच मागणी करुन तडजोडी अंती पहिला हप्ता तीन हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले आहे.

vivek

Recent Posts