Dharashiv ACB Trap : धाराशिव ; जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपीक चव्हाण यास 25 हजारांची लाच घेताना अटक
Dharashiv ACB Trap : कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब येथे सुरक्षारक्षक नेमणूक करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाने मागितली लाच
धाराशिव :- कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब येथे सुरक्षारक्षक यांच्या नेमणुकी करिता मंजुरी मिळावी याकरिता जिल्हा उप निबंधक मुख्य लिपिका यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सचिवाकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. 50 Thousand Bribe In Dharashiv तडजोडीअंती 25 हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव Anti-Corruption Department, Dharashiv यांनी मुख्य लिपिक दयानंद चव्हाण (45 वय) यांना ताब्यात घेतले आहे. Dharashiv ACB Trap
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सचिव आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळणेकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे सभापती यांचे स्वाक्षरीने जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव येथे अर्ज केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी आदेश देण्याकरीता यातील जिल्हा उपनिबंधक दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50 हजारांची रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 25 हजारांची रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्वीकारली असता चव्हाण यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Dharashiv ACB Trap
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नानासाहेब कदम,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक ,पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, नागेश शेरकर यांनी कारवाई केली आहे. Anti-Corruption Department, Dharashiv