क्राईम न्यूज

Dharashiv ACB Trap : रेशीम शेतीच्या बिलाचे ई-मास्टर करण्यासाठी मागितली लाच ; कृषी अधिकारी कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

Dharashiv ACB Arrested Bribe Person : आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धाराशिव :- शेतीतील तुती रेशीम लागवडीच्या मास्टर भरून संबंधित कार्यालयात जमा करण्यासाठी तसेच बिल मंजूर करण्यासाठी ऑनलाइन ई-मस्टर करण्यासाठी 300 रुपयांची लाच घेताना तुळजापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या धाराशिव पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अतुल शहाजी देशमुख (37 वय) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात Tuljapur Police Staion गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर डाटा एन्ट्रीचे ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एका लिपिकाला तीनशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.यातील तक्रारदार यांचे मुलाचे नावे शेतातील तुती रेशीम लागवडीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तुळजापूर येथे दाखल केला होता. त्यास दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 4 लाख 18 हजार 815 रुपये ची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. शेतामध्ये तक्रारदार यांनी तुती रेशीम लागवड करून 05 मस्टर भरून संबंधित कार्यालयात जमा केले होते. त्यापैकी 04 मस्टरचे 27 हजार 621 रुपयाचे बील मंजुर झाले होते.परंतु ते त्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. आज रोजी 04 वरुन मागील आठवड्यांचे मनरेगाचे ऑनलाईन ई-मस्टर काढण्यासाठी यातील अतुल देशमुख (कंत्राटी लिपिक) याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 300 रुपयेची लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारताना एसीबीने सापळा रचून आरोपी लाचेची रक्कम ‌स्वतः स्विकारली असता त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबी पथक

संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक – पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, शशिकांत हजारे . यांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago