Dharashiv ACB Trap News : अंगणवाडी मदतनीस पदावरून नियुक्ती करण्याकरिता मागितली 15 हजार रुपयांची लाच, एसीबीने लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना केले अटक
धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंध विभाग, धाराशिव Anti-Corruption Department, Dharashiv यांनी कारवाई करत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यातील कनिष्ठ सहाय्यक आणि अंगणवाडी सेविका यांना पंधरा हजार रुपयांची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 15 Thousand Bribe मई बळीराम खांडेकर (34 वय) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यान्वित असून अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम (28 वय) या दोघींना लाचप्रकरणी एसीबीने अटक केली आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. Anti-Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेला माहितीनुसार,यातील मई खांडेकर कनिष्ठ सहाय्यक आणि सोनाली कदम अंगणवाडी सेविका यांनी यातील तक्रारदार यांचे पत्नीचे (मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर) येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन यातील खांडेकर यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वतः स्विकारली असता खांडेकर आणि कदम याना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Anti-Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक पोलीस- अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी दत्तात्रय करडे यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. Anti-Corruption Bureau Latest News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…