धाराशिव : तलाठी व लिपिकाला (खाजगी) लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

•Chhatrapati Sambhajinagar Bribe News तलाठी भूषण चोबे (31) आणि लिपिक(खाजगी) भारत मगर (64) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.
छत्रपती संभाजीनगर :- तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी भूषण चोबे (31 वय) आणि लिपिक(खाजगी) भारत मगर (64 वय) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतामधील कुळाचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तसेच त्या करणेकरिता स्थळ पाहणी करून पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यासाठी तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजाराची लाचेची मागणी केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे वडिलांचे नावे असलेल्या शेत गट (न. 15/10) मधील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तहसिल कार्यालय, धाराशीव येथे अर्ज दाखल केला होता अर्जावरुन तहसिलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना अर्जदार यांचे अर्जावरुन स्थळपाहणी करुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरून तक्रारदार यांचे शेताची स्थळ पाहणी करुन पंचनामा करुन स्थळ पाहणी अहवाल मंडळ अधिकारी यांचे मार्फतीने तहसिलदार यांना सादर करण्यासाठी तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर हे तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपयांची लाच मागणी करत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांनी आज दिनांक 05/05/25 रोजी मोबाईल वरून एसीबी कार्यालय धाराशिव यांच्याकडे तक्रार दिली होती.त्यावरून आज रोजी तलाठी कार्यालय, वाघोली धाराशिव येथे आरोपीचे कार्यालयात पडताळणी केली असता आरोपी तलाठी भूषण चोबे याने तक्रारदार यांचे वडिलांचे अर्जावरुन स्थळपाहणी करुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्यासाठी खाजगी लिपीक भारत मगर यांचे मार्फतीने पंचासमक्ष पाच हजार रुपयेची लाच मागणी करुन तडजोडीअंती चार हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील आरोपी तलाठी चोबे याचेविरुध्द कलम 12 भ्र.प्र.अधिनियम अन्वये व आरोपी क्रमांक 02 याचेविरुध्द कलम 7 अ भ्र.प्र.अधिनियम अन्वये पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन आरोपींना अटक करून पुढील तपास चालू आहे. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दाराम म्हेत्रे,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि धाराशीव यांच्या पथकाने कारवाई केली आहे.



