Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनामा देणार? पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडेंचा दावा, ‘दोन दिवसांपूर्वीच अजित पवार…’

Dhananjay Munde Meet Devendra Fadnavis : सोमवारी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुंबई :- सरपंच संतोष देशमुख खून Santosh Deshmukh Murder प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे राजीनामा देतील, असा दावा त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे Karuna Munde यांनी रविवारी (02 मार्च) केला होता.करुणा मुंडे यांनीही अजित पवार Ajit Pawar यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचे खरे कारण अद्याप समोर आले नसले तरी फडणवीस यांच्या भेटीमुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केला की काय, अशी अटकळ जोर धरू लागली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या चर्चेत काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही. विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे.