मुंबई
Trending

Dhananjay Munde : बीडच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकीय भूकंप; धनंजय मुंडेंची SIT चौकशीची मागणी

Beed coaching class abuse case : “महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी हवी” — धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी

मुंबई | अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक प्रकरणाने बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असून, यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट SIT चौकशीची मागणी केली आहे. Beed coaching class abuse case त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची विनंती लेखी स्वरूपात केली.

प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. “या कोचिंग क्लासेसमध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर छेडछाड व लैंगिक अत्याचार झाले. याच ठिकाणी त्यांची भगिनी मायमाऊलीही जात होती. आरोपींना राजकीय वरदहस्त लाभलेला असून, यामध्ये स्थानिक आमदारांचा प्रत्यक्ष सहभाग आहे,” असा गंभीर आरोप मुंडेंनी केला.

धनंजय मुंडे म्हणाले, “हे प्रकरण आता केवळ CDR (Call Detail Record) वर थांबलेले नाही, तर IPDR (Internet Protocol Detail Record) तपासही गरजेचा आहे. कोण, कुठे होता? कोणाचे फोन कुठे गेले? हे सगळं तपासल्याशिवाय खरा गुन्हेगार आणि त्याला आश्रय देणाऱ्यांचे चेहरे उघड होणार नाहीत.”

याप्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून, आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मुंडे यांनी या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांचा “राईट हँड” असलेल्या आरोपीवर लक्ष केंद्रित करून, हे संपूर्ण षड्यंत्र असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण ते लवकरच विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0