Dhananjay Munde: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडे यांना आर्धांगवायू झाल्याचे वक्तव्य
मुंबई :- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य धनंजय मुंडे याने फेटाळले असून, त्यांना अर्धांगवायू झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याचा पुनरूच्चार केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की,बाबासाहेब पाटील यांच्या अर्धांगवायू झाल्याच्या विधानावर स्पष्टीकर देताना धनंजय मुंडे यांनी एक्सवर लिहिले की, “आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी हा आजार झाला असून, त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.”
बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र, मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे. त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होत असून बोलायला त्रास आहे. मात्र, नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…