•पोलिसांना चकवा देत होता सातत्याने ठिकाणं बदलणारा आरोपी; गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पाळत ठेवून गुंडा पथकाने केली शिताफीने अटक
मुंबई, देवनार : -मुंबई पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या एका गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा 10 महिन्यांचा ‘फरारी’ प्रवास देवनार पोलिसांनी आज संपुष्टात आणला आहे. पोलिसांना वारंवार गुंगारा देत पळणाऱ्या आरोपी इस्माईल इब्राहिम शेख (वय 35) याला गुन्हे शोध पथकाने (गुंडा पथक) मानखुर्द परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली.
गुन्हेगाराचा थरारक प्रवास
देवनार पोलीस ठाण्यात 22 जानेवारी 2025 रोजी इस्माईल शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून इस्माईल हा सातत्याने आपली ठिकाणे बदलत होता आणि पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, देवनार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या वॉन्टेड आरोपीला पकडण्याचा चंग बांधला होता.
सापळा यशस्वी
आरोपी इस्माईल शेख हा त्याच्या मानखुर्द येथील रहिवासी संत सेवालाल महाराज चाळीत येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच, पोलिसांनी कोणतीही संधी न गमावता तत्काळ त्याच्या घराभोवती सापळा रचला. अत्यंत शांत आणि योजनाबद्ध पद्धतीने पोलिसांनी कारवाई करून, आरोपी इस्माईल शेखला ताब्यात घेतले आणि अटक केली.
मागील दहा महिन्यांपासून ‘वॉन्टेड’ असलेल्या आरोपीला पकडण्यात मिळालेले हे यश देवनार पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार अंगरंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे आणि पोलीस शिपाई अभिजीत करवडे यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…