Uncategorized
Trending

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेचा गोंधळ, नेम प्लेट काढून फेकली

Devendra Fadnavis office attack: : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर आज (27 सप्टेंबर) एका महिलेने गोंधळ घातला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नेम प्लेट काढून खाली फेकली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चेहरा दिसत आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेचा शोध सुरू केला आहे. Devendra Fadnavis office attack

एका अनोळखी महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील‌ कार्यालय बाहेर गोंधळ घातला. या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न घेताच मंत्रालयात दाखल झाली होती. ही महिला सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात दाखल झाली.पोलीस आयुक्तांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी मंत्रालय परिसरात पोलिसांची फारशी उपस्थिती नव्हती. त्यामुळेच ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सहज सचिवालयाच्या गेटमधून आत शिरली. Devendra Fadnavis office attack

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0