[ पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणार पाण्याचा ओलावा ; शेतकऱ्यांनी मानले आ. राहुल कुल यांचे आभार ]
दौंड, ता. २० दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानंतर धोरण निश्चित करण्यात येणार आहे. दौंड येथील विविध विकासात्मक कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Daund Latest News
यावेळी आमदार राहूल कुल, MLA Rahul Kul आमदार जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह दौंड तालुक्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
खडकवासला धरण ते फुरसुंगी-लोणी काळभोरपर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंजुरी देणे. जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत स्थापन केलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून, धोरण निश्चित करणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. हे विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता व मंत्रिमंडळ मान्यता मिळणे तसेच राज्यातील चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मूलनासाठी सुधारित धोरण निश्चित करून दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
यवत येथील सिटी सर्व्हे ५५० व ५७४ मधील जलसंपदा विभागाच्या नावे असलेल्या १ हे. ३० आर क्षेत्रापैकी १ हे. क्षेत्र यवत पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत बांधकामाकरिता पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगून दौंड तालुक्यातील एमएसईडीसीएल च्या विविध समस्या आणि मागण्यांकरिता ऊर्जा सचिवाना सूचना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
” बंधारा शेतकऱ्यांना वरदान ठरेल” —- मलटण, वाटलुज, हिंगणीबेर्डी, काळेवाडी पूर्व भागातील शेतकऱ्यांची ही मागणी खूप वर्षापासूनची होती. भविष्यात शेतकऱ्यांना शेतीचे पीक घेण्यासाठी तसेच पशुपक्ष्यांसाठी बंधारे वरदान ठरेल. आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून बंधारा मंजूर करून दिला. त्याबद्दल आ. राहुल कुल यांचे अभिनंदन व आभार
— गणेश गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य हिंगणीबेर्डी, काळेवाडी
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…