•’भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही’; फडणवीस म्हणाले: ‘निराश झालेल्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नसतं.’
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या जोरदार टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले,” असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंच्या भाषणाला महत्त्व न देण्याचा प्रयत्न केला.
‘एक हजार रुपये वाचले!’
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना, “मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आताच्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर, तर आपले मुख्यमंत्री (फडणवीस) दहाव्या क्रमांकावर आहेत,” अशी टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, परंतु पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही, त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले.”
यासोबतच, त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताना म्हटले की, “एखादा व्यक्ती निराश झाला तर तो अदवातदवा बोलत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते.”
शेतकऱ्यांच्या मदतीवरून टीका
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी हताश झाला असून, महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता. “बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले, पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही,” अशी टीका ठाकरेंनी केली होती.
हिंदुत्व आणि ‘हिरवा रंग’
भाजपच्या हिंदुत्वावर टीका करताना ठाकरे म्हणाले होते, “एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे.”
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…