मुंबई
Trending

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी पूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं डिमांड!

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या 10 मागणीचे डिमांड, देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत अंबादास दानवे यांनी केल्या या मागण्या

मुंबई :- महायुतीतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतचा सस्पेन्स संपला असून आज सायंकाळी पाच वाजता भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा मागण्या केल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर टॅग करत अंबादास दानवे यांनी अनेक मागण्या मराठवाड्यासाठी केल्याचे पाहायला मिळत आहे.

अंबादास दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,

देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन! विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील… पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल ही अपेक्षा..

१. जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी.

२. पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.

३. छत्रपती संभाजीनगर- नगर- पुणे ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर नको, तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर- नगर- पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती व्हायला हवी.

४. जालना- नांदेड दरम्यान ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हायला हवे.

५. ऑरिक- बिडकीनच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमी अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात द्यावी.

६. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे ‘तीन महिन्यात’ शहरवासीयांना दररोज पाणी द्या. अन्यथा आंदोलनांच्या मालिकेला सामोरे जा.

७. मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नांवर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबाह्य पाणीपुरवठा यॊजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी.

८. पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे द्या.

९. घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग आहेत. देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत.

१०. विदर्भातील ‘मिहान’च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना इथे येऊन स्थलांतराच्या नावाखाली प्रलोभने देऊ नयेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0