पुणे
Trending

Devendra Fadnavis : पुण्यात महायुतीत ‘ठिणगी’! फडणवीसांचा अजितदादांना शेरोशायरीतून इशारा; “हम किसी के बाप से डरते नहीं!”

Devendra Fadnavis : पुण्याच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; “आरशात तोंड बघा” म्हणत फडणवीसांचा टोला

पुणे | पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सत्तेसाठी महायुतीतील मित्रपक्षच आमनेसामने ठाकले आहेत. “70 हजार कोटींचा आरोप असूनही मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे,” या अजित पवारांच्या विधानाने आणि भाजपच्या त्रिकुटावर (फडणवीस, मोहोळ, पाटील) केलेल्या टीकेने दुखावलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कात्रज येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांना ‘आरसा’ दाखवला आहे.

“बात निकलेगी तो दूर तलक जाएगी!”

अजित पवारांनी पुण्याच्या संथ विकासकामांवरून भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “निवडणुकीचा रंग भरत असताना जितकी मागे ही चर्चा जाईल, तेवढे ‘तुम्ही काय केले’ हे लोकांना सांगावे लागेल. उत्तर दिले नाही तर लोक दुर्बल समजतात. पण आमचा फोकस केवळ विकासावर आहे.” पुण्यात सध्या 9 हजार कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत त्यांनी दादांच्या आरोपांतील हवा काढून घेतली.

शेरोशायरीतून दिला थेट इशारा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात फिल्मी स्टाईलने शेरोशायरीचा वापर करत अजितदादांना ठणकावले. “शरीफ हैं हम, किसी से लडते नहीं, वरना जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं” असे म्हणत त्यांनी महायुतीत राहून भाजपवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला. “गेल्या पाच वर्षांत आम्ही काय केले, हे विचारण्यापूर्वी तुम्हाला आरशात स्वतःचे तोंड बघावे लागेल,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या ‘त्रिकुटा’चा दादांवर हल्लाबोल केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दादांवर टीकेची झोड उठवली. “दादा अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते, मग तेव्हा शहराचा भरीव विकास का झाला नाही?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तर पुणेकर आता विरोधकांना (आणि मित्रपक्षातील विरोधकांनाही) सत्तेपासून दूर ठेवतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत रंगत वाढली अजित पवार आणि भाजपमधील या जुंपलेल्या वादामुळे पुण्याचे राजकारण कमालीचे गरम झाले आहे. एका बाजूला महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे जागावाटप आणि श्रेयवादावरून सुरू झालेला हा ‘राडा’ मतदारांना कोणाकडे झुकवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0