मुंबई

Devendra Fadnavis On Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना पुन्हा अटक होणार का? महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप, ‘मी…’

•सीबीआयने अनिल देशमुख यांच्यासह अनेक जणांवर भाजप नेत्यांविरोधात कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. भाजपच्या अधिकाऱ्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह अनेकांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे आरोप?

तत्कालीन राज्य सरकार भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यावेळी त्यांनी सभागृहात पेन ड्राइव्ह सादर केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया खुद्द अनिल देशमुख यांनी दिली आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘X’ वर पोस्ट करून असे लिहिले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे.
माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत.
ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0