मुंबई

Devendra Fadnavis : भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर फडकला, मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Devendra Fadnavis On Lawrence Bhisnoi : लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडांचे गौरव कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पोलिसांना तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

नाशिक :- नाशिकमधील सिडको परिसरात हिंदू विराट सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर Lawrence Bhisnoi दाखवल्याबद्दल कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हिंदू विराट सभेदरम्यान अचानक तिथे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक मोठा बॅनर दिसला. बॅनर दिसताच बैठकीत गोंधळ उडाला. त्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले.लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडांचे गौरव कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पोलिसांना तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात Nashik Ambad Police Station अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे बॅनर एका अल्पवयीन मुलाने लावले होते. पोलिसांनी फोटोंद्वारे दहशत पसरवण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago