मुंबई

Devendra Fadnavis : मी कोणाच्या नादी लागत नाही,माझ्या नादी लागणाऱ्यांना सोडत नाही

•श्याम मानव सुपारी बाजारच्या नादाला लागले तर नाही ना हे पाहावे लागेल ; Devendra Fadnavis

मुंबई :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहे आता या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाचार घेण्यात आला आहे. राज्यात माझ्यावर टीका करण्यासाठी काही सुपारी बाजी तयार झाले असून हे सुपारी घेऊन आपल्यावर आरोप करतात श्याम मानव हे या सुपारीबाज च्या नादी लागले का हे पाहावे लागेल असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे अजित पवार आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांना खोटे आरोप करावेत यासाठी फडणवीस यांनी अनिल देशमुख यांवर दबाव टाकून त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र पाठवल्याचे म्हटले होते त्यावर आता फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.मला एकदा विचारायला हवं होतं फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला श्याम मानव लागले तर नाही ना, हे एकदा पाहावं लागेल.

माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचं आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही, असा इशाराही त्यांनी देशमुख यांना दिला.

मनोज जरांगे यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटमध्ये राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगेंची केस आहे ती 2013 सालची आहे. या पूर्वीदेखील त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आलं होतं. पण ते हजर राहिल्यानंतर ते रद्द झालं. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट निघालं. ते तारखेवर हजर राहिले तर वॉरंट रद्द होतात. आमच्यावरही असे अनेक वॉरंट निघाले आहेत. अटक वॉरंट निघालं आणि त्यावर कोर्टात हजर राहिलं तर ते वॉरंट नंतर रद्द होतं.जरांगेंचा उपोषणामुळे संताप झाला असावा मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे गेल्या वेळी माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली. उपोषणामुळे त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे तसं वक्तव्य झालं असं ते म्हणाले होते. आताही उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली असतील.

देशमुख जेमध्ये गेले, आता बेलवर बाहेर आलेत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आताही ते बेलवर बाहेर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0