महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पूरग्रस्त माढ्याची पाहणी

CM Devendra Fadnavis Solapur Visit : निमगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला आढावा

सोलापूर, माढा :- महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतीत झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (24 सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचा दौरा केला. माढा तालुक्यातील निमगाव येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

नुकसानीची घेतली माहिती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमगावातील शेतीचे आणि घरांचे पावसामुळे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे पिकांचे, जमिनीचे आणि घरांचे किती नुकसान झाले आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या कठीण काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत मंत्री जयकुमार गोरे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago