Devendra Fadnavis : भाजपच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या?
bjp first candidate list of maharashtra assembly election 2024 : भाजपने आपले 99 उमेदवार जाहीर केले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असल्याने आता या उमेदवारांना प्रचारासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी आहे.
नागपूर :- नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांना तिकीट दिले आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.भारतीय जनता पक्षाने मला सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत maharashtra assembly election 2024 संधी दिल्याचे फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सर्व आदरणीय नेत्यांचा अत्यंत आभारी आहे.
पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.
भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!
20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच्या महिनाभरापूर्वीच भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात प्रचारासाठी फार कमी दिवस राहिले आहेत. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.