•देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा हिला दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली
मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शंभरहून अधिक दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा तिला दहावीच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आल्यानंतर एक हाती सत्ता हाती घेतल्यानंतर 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती.पण तेव्हापासून ते ‘सागर’ या आपल्या जुन्याच निवासस्थानी राहत होते. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर केव्हा राहण्यास जाणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात सपत्नीक गृहप्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे या गृहप्रवेशाची माहिती दिली. तसेच काही फोटोही शेअर केले.
सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…