Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेणार भेट
Devendra Fadnavis Meet Amit Shah : मुख्यमंत्री पदाकरिता देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची शक्यता, फडणवीस उद्या घेऊ शकतात शप्पथ
मुंबई :- राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश येऊन आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न सध्या उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे चर्चा सध्या जोर धरू लागले आहे. तर भाजपाकडून मुख्यमंत्री पदाकरिता देवेंद्र फडणवीस यांचे नाव यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. तर एकीकडे शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्री पदाकरिता दावा केला जात असल्याच्या चर्चा राजकीय पटलावर आहे.आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. रात्री साडे 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली करण्यात येत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्ली रवाना झाले असून रात्री साडे 10 वाजता त्यांची अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचे माहिती आहे. फडणवीसांपाठोपाठ अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबतचा फॉर्म्युला किंवा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना किती वर्षांसाठी मुख्यमंत्री पद द्यायचे तसेच अजित पवारांना द्यायचे की नाही, याबाबतची अंतिम चर्चा या बैठकीत होणार आहे. तसेच या बैठकीत राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. याबाबत आज निर्णय झाल्यास उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.