मुंबई

Devendra Fadnavis : विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभात देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी

Devendra Fadnavis Latest News : “राहुल गांधी युवा नेता असतील, तर आम्हीही युवा!” – फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

मुंबई :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात आला असून, विधान भवनात त्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर अनेक सदस्यांनी त्यांचे कौतुक करत एकप्रकारे त्यांना भावनिक निरोप दिला. मात्र या निरोप सोहळ्यातही फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी लक्ष वेधून गेली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हणाले, “जोपर्यंत राहुल गांधी युवा नेता राहू शकतात, तोपर्यंत आम्ही दोघेही युवा राहू शकतो,” असे सांगत त्यांनी सभागृहात हास्याची लाट उसळवली. अंबादास दानवे यांची सुरुवात भाजपमध्ये झाल्याचे सांगत, “ते पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यामुळे सुरुवातीला वाटलं की हे बातम्या संकलित करतील, पण प्रत्यक्षात ते बातम्याच निर्माण करणारे ठरले,” असा उल्लेख करत फडणवीसांनी त्यांचं कौतुकही केलं.

दानवे यांच्या कार्यशैलीत चिकाटी, संघटनकौशल्य आणि साधेपणाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “भाजपच्या मुशीत तयार झालेले असल्यामुळे त्यांच्यात संघटन कौशल्य पाहायला मिळालं, आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांची जवळीक देखील दिसून आली.” त्यांनी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत दानवे यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याचंही सांगितलं.

यानंतर फडणवीसांनी टोलेबाजीच्या खास शैलीत पुढचा विरोधी पक्षनेता कोण, याबाबत सूचक इशारा देताना म्हटलं, “दानवे यांचा कार्यकाळ संपतो आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही संपेल. आता परब साहेब, तुम्ही तयारीत रहा!” असा टोला अनिल परब यांना दिला. तसेच अध्यक्षांच्या निर्णयावर हे पद अवलंबून राहील, असंही ते म्हणाले. याच अनुषंगाने त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावत सांगितलं की, “त्यांना वाटलं तर ते इकडे येऊ शकतात!”

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अंबादास दानवे यांच्या कारकीर्दीचे कौतुक करताना सांगितलं, “ते नशीबवान आहेतच, पण त्याचसोबत त्यांचं कर्तृत्वही लक्षणीय आहे.” पवार पुढे म्हणाले, “नगरसेवक पदावरून सुरुवात करून ते थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचले, ही त्यांच्या जिद्दीची व यशस्वी प्रवासाची साक्ष आहे. संसदीय लोकशाहीत विधान परिषदेचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भक्कम भूमिका निभावली.”

दानवे यांनी 2022 पासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या जागी आता कोण नेमले जाईल, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले असून विरोधकांकडून त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago