Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शायरीतून हल्ला, ‘जो ये कहते थे कि रास्ते में…’

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसवर शायरीतून हल्ला केला.
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना विरोधकांची बोलती बंद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायरीतुन विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
साकी अमरोहवी यांची ओळ वाचताना ते म्हणाले की,”मंज़िलें लाख कठिन आएं, गुजर जाऊंगा. हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा…चल रहे थे जो मेरे साथ कहां हैं वो लोग? जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा. लाख रोके ये अंधेरा मेरा रास्ता लेकिन, मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा…”
दुसऱ्या शायरीतून फडणवीस यांनी विरोधकांना पुन्हा एकदा खास करून जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. “आप इतना भी गरज गरज के ना बरसों, की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं….खैर मुश्किल मुझ में तो अभी साख बाकी है….आप खुद अपनी फितरत के बारे में सच बोलो….आप में वह पहले वाली बात कहा बाकी है…
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.