मुंबई

Devendra Fadnavis : बकरीदपूर्वी मोठा निर्णय! पशुबाजार बंदीचा आदेश अखेर मागे

Devendra Fadnavis On Bakra Eid 2025 : मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक, मुस्लिम समाजात समाधानाची लाट

मुंबई :– राज्य सरकारने बकरीदपूर्वी घेतलेला पशुबाजार बंदीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. Devendra Fadnavis On Bakra Eid 2025 त्यामुळे राज्यातील कोणताही पशुबाजार 3 ते 7 जूनदरम्यान बंद राहणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

27 मे रोजी गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र पाठवून बकरीदच्या काळात गोवंशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव बाजार बंद ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र या निर्णयामुळे मुस्लिम समाजात असंतोष पसरला होता, कारण त्यामुळे बकरीदसाठी बकर्यांची खरेदी-विक्री अडथळ्यात येत होती.

बकरीदसाठी बकर्यांची उपलब्धता सुरळीत होणार!

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी स्पष्ट केलं, “राज्यात आधीच गोवंश वधबंदी लागू आहे. त्यामुळे गोसेवा आयोगाचा आदेश अनावश्यक व गैरकायदेशीर होता.” त्यांच्या या भूमिकेनंतर सरकारने तातडीने लक्ष घालून निर्णय मागे घेतला.

हा निर्णय सार्वजनिक झाल्यानंतर मुस्लिम समाजात समाधान व्यक्त होत आहे. आता बकरीदचा सण पारंपरिक पद्धतीने, कोणतीही अडचण न येता साजरा करता येणार आहे.

vivek

Recent Posts