Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देवेंद्र फडणवीसांकडून बिहारच्या जनतेचे अभिनंदन; ‘विकास आणि सुशासन’ हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचा दावा
मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीत Bihar Election भाजपप्रणित एनडीए NDAआघाडीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आनंद व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमत दिले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. Bihar Election Latest News
राहुल गांधींवर टीकास्त्र
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील, तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहील.” काँग्रेसवर थेट हल्ला चढवताना ते म्हणाले, “काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय. बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात कमी स्कोअर आहे.”
राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा काढून यात्रा काढल्या, नदीत उड्या टाकल्या, डान्स करून बघितला; परंतु लोकांचा विश्वास मोदीजी आणि नितीश कुमार यांच्यावरच असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बिहार विजयाची कारणे
देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील विजयाची कारणे स्पष्ट केली.”बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे.”
ते म्हणाले, “बिहार निवडणुकीत सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत. विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरला.”या निवडणुकीत ‘प्रो-इन्कम्बन्सी’ (Pro-Incumbency) दिसली, ज्यामुळे एनडीएला २०१० चा विक्रम मोडून मोठा विजय मिळाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकंदरीत, बिहारच्या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांनी विजयाचे श्रेय थेट पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि राज्याच्या विकासावर शिक्कामोर्तब केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…