मुंबई

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा: कराडमध्ये ‘विठ्ठला’चे दर्शन, तर फलटणमध्ये ‘सावली’सारख्या अंगरक्षकाच्या कुटुंबाचे सांत्वन

DCM Sunetra Pawar First Visit : विमान अपघातात प्राण गमावलेल्या विदीप जाधवांच्या निवासस्थानी सुनेत्रा वहिनी भावूक; सात वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा

फलटण/कराड | अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर राज्याची धुरा खांद्यावर घेतलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Sunetra Pawar आज आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर निघाल्या. या दौऱ्यात राजकीय झगमगाटापेक्षा अधिक ओलावा होता तो जुन्या नात्यांचा आणि निष्ठेचा. कराडच्या प्रीतीसंगमावर नतमस्तक झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी थेट फलटणच्या तरडगावात पोहोचल्या आणि ज्यांनी सात वर्षे सावलीसारखी दादांची साथ दिली, त्या विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसले.

यशवंतरावांच्या स्मृतींना अभिवादन

सोमवारी सकाळी सुनेत्रा पवार यांचे कराडमधील प्रीतीसंगम बागेत आगमन झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. अजितदादा ज्यांच्या विचारांनी चालले, त्याच महामानवाचे आशीर्वाद घेऊन वहिनींनी आपल्या नव्या प्रवासाचा श्रीगणेशा केला.

अंग रक्षक नव्हे, कुटुंबाचा सदस्य!

कराडहुन सुनेत्रा पवार यांचा ताफा थेट फलटणमधील तरडगावाकडे वळला. 28 जानेवारीच्या त्या काळरात्री विमान अपघातात अजितदादांसोबत ज्यांनी प्राण गमावले, ते त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) विदीप दिलीप जाधव यांच्या घरी सुनेत्रा वहिनी पोहोचल्या. विदीप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना वहिनींचे डोळेही पाणावले होते.

7 वर्षांची निष्ठा: 2009 च्या पोलीस बॅचचे असलेले विदीप जाधव गेल्या 7 वर्षांपासून सावलीसारखे दादांसोबत असायचे.

शब्दांपलीकडचे दुःख: विदीप यांच्या पत्नी आणि आई-वडिलांची भेट घेऊन सुनेत्रा पवारांनी त्यांचे सांत्वन केले. “जाधव कुटुंब हे आमचेच कुटुंब आहे आणि या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत,” असा धीर त्यांनी यावेळी दिला.

रोहित पवारांचा मदतीचा हात

यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आज सुनेत्रा वहिनींच्या भेटीने पवार कुटुंबीय आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago