लोकाभिमुख सेवा आणि डिजिटल यंत्रणांचा अवलंब करून स्मार्ट कामकाजाची अपेक्षा,परिवहन विभागाला गती देण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळात ठोस पावले
कल्याण :- कल्याण येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी त्यांनी परिवहन विभागाने अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, परिवहन विभाग हा राज्याचा कणा असून, यंत्रणांनी नागरिकांच्या सेवेत तत्पर राहिले पाहिजे. प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागात कार्यक्षमतेने गती आली आहे. एसटी विभागासह संपूर्ण मंत्रालयाचे सुयोग्य व्यवस्थापन होऊन सामान्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.
या नव्या कार्यालयातून लायसन्स, परवाने आदी सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ची जाणीव होईल आणि सेवा जलद व प्रभावी होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समारंभास मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आदी मान्यवर तसेच अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…