•36 तासात आरोपीला अटक, मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मिरा रोड :- मिरा रोड पोलिस ठाण्याचे हद्दीत मिरा रोड येथे रहाणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलाला “भाईंदर किधर है” असे विचारून एका डिलिव्हरी बाॅयने स्कुटीवर बसून घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर एका नवीन इमारतीमध्ये घेऊन तिथे तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अवघ्या 36 तासात आरोपीला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीचे विनयभंगाचा असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी नमूद गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवून अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी याचा गुन्हयाचे घटनास्थळावरून कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत होता. पोलिसांनी आरोपी अजय धर्मा गुप्ता, (वय 23 , व्यवसाय स्विगी डिलीव्हरी, रा. युथ व्हॅली गेस्ट हाऊस, दिपक हॉस्पिटलचे पाठीमागे, क्वोन्स पार्क, मिरारोड पू, मुळ रा.ता. फतेहबाद, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश) याला गुन्हयात अटक करण्यात आलो आहे.गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले हे करत आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ01, मिरारोड, डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, मेघना बुरांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरारोड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले, संतोष सांगवीकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार सेदीप गिरमे, हनुमंत तेरवे, बालाजी हरणे, प्रकाश पवार, पोलीस शिपाई शंकर शेळके, अथर्व देवरे व चंद्रदीप दासरे अधिकारी/अंमलदार यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…