Delhi Marathi Student Suicide News : ‘स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा’; 10 वीतील शौर्य पाटीलच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
ANI :- दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत 10 वी मध्ये शिकणाऱ्या मूळच्या सांगलीच्या एका मराठी विद्यार्थ्याने शिक्षिकांच्या मानसिक छळाला कंटाळून मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता. Delhi Student Suicide News
शौर्य पाटील हा दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी त्याने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दिल्ली पोलिसांनी शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये एक दीड पानाची सुसाइड नोट जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्याने आत्महत्येमागे शाळेतील शिक्षिकांचा छळ कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. “मेरा नाम शौर्य पाटील हैं…स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा…सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूँ…स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू…” असे भावनिक शब्द त्याने या चिठ्ठीत लिहिले आहेत. तसेच, त्याने आई-वडिलांची माफी मागितली असून, गरजूंना आपले अवयव दान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
सुसाइड नोट आणि वडिलांच्या तक्रारीवरून राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज शौर्यवर त्यांच्या मूळ गावी, ढवळेश्वर (ता. खानापूर, जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…