
Delhi New CM Rekha Gupta : रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल.
ANI :- शालीमार बागेतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता BJP Leader Rekha Gupta दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी (19 फेब्रुवारी) भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 50 वर्षीय आमदार रेखा गुप्ता यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. Delhi New CM Rekha Gupta या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.
शालिमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रेखा गुप्ता गुरुवारी रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात शपथ घेणार आहेत, जेथे 25 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या शपथविधी सोहळ्याला भाजपचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शालिमार बागेत 29 हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या रेखा गुप्ता या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची भूमिका निभावणाऱ्या चौथ्या महिला असतील.सध्या ममता बॅनर्जींसोबत त्या भारताच्या काही महिला मुख्यमंत्र्यांपैकी एक असतील.
रेखा गुप्ता यांनी आपला राजकीय प्रवास दिल्ली विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) सह सुरू केला, तेथून त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) अध्यक्ष झाल्या.