Taloja Police News : गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश! — ‘हिस्ट्रीशीटर’ इम्तियाज शेख व टोळीवर तळोजा पोलिसांचा धडाकेबाज गुन्हा”

Taloja Police Arrested Imteaj Shaikh Gang : बांधकाम साईटवरून लाखोंच्या लोखंडी सळ्यांची चोरी; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तळोजा :- तळोजा परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ! गुन्हेगारी इतिहास असलेल्या इम्तियाज ख्वाजा शेख व त्याच्या नऊ साथीदारांनी बांधकाम साईटवरून लाखोंच्या लोखंडी सळ्या चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोजा पोलीस ठाण्याने Taloja Police Station या सर्वांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या जाळ्यावर पोलिसांनी घातलेली ही मोठी गदा मानली जात आहे. संशयितांमध्ये ओमप्रकाश चौधरी, मेहफूज अहमद खान, निजाम अली, रूद्रप्रसाद चौधरी, जलालुद्दीन खान, संतोष गौतम, मशुकअली अन्सारी आणि मोहम्मद अली यांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या लोखंडी सळ्या बेकायदेशीररित्या हस्तगत केल्या. त्यानंतर त्या चोरी करण्यात आल्या. सदर गुन्ह्याचा तपास सध्या तळोजा पोलिसांकडून गुप्त पद्धतीने सुरू आहे.
‘हिस्ट्रीशीटर’ इम्तियाज शेखचा मोबाईल नंबरही पोलिसांकडे असून (+91 907645927), या टोळीने याआधीही अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्थानिक बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून अधिक माहिती लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते.


