Delhi NCR Earthquake : दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, लोक घाबरून घराबाहेर पडले!

•सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक जागे झाले आणि घाबरून घराबाहेर पळाले.
ANI :- सोमवारी (17 फेब्रुवारी) पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक जागे झाले आणि घाबरून घराबाहेर पळाले.प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असून त्याची तीव्रता 4 एवढी मोजण्यात आली. तिव्रता 4 असली तरी भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असल्याने आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5 : 36 : 55 वाजता नवी दिल्लीत 4.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की इमारती हादरल्या आणि लोक घराबाहेर पडले.ते 28.59 अंश उत्तर अक्षांश आणि 77.16 अंश पूर्व रेखांशावर होते. कमी खोली आणि केंद्र दिल्लीत असल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये जास्त जाणवले.