Delhi CM Rekha Gupta Attack : जनसुनावणीदरम्यान अचानक घडला हल्ला; हल्लेखोराने कानशिलात मारून मारहाण केल्याचा आरोप
ANI :- दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता Delhi CM Rekha Gupta यांच्यावर आज सकाळी त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी (जनता दरबार) सुरू असताना एका व्यक्तीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनपेक्षित हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सिव्हिल लाईन्स परिसरात जनता दरबार सुरू होता. त्यावेळी एका व्यक्तीने रेखा गुप्ता यांना एक निवेदन दिले. अचानक हा व्यक्ती आक्रमक झाला आणि त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानशिलात मारली. एवढेच नव्हे, तर त्याने त्यांचे केस पकडून मारहाण केल्याचाही आरोप आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी हल्लेखोर नैराश्यग्रस्त राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक विधान केले आहे, ज्यामुळे या घटनेमागे राजकीय उद्देश आहे का, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
हल्लेखोराचे वय 35 वर्षे असून, पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे, त्यानंतर त्यांच्या जखमा किती गंभीर आहेत हे स्पष्ट होईल. भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि नेते रमेश बिधुरी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला जनसुनावणीमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या पुढील
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…