Delhi CM Atishi Oath : आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले
Delhi CM Atishi Oath Ceremony : राज निवास येथे आयोजित समारंभात आप नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एलजी व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ANI :- आम आदमी पार्टीचे नेते AAP Membe Atishi आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ Delhi CM Atishi Oath Ceremony घेतली आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी शनिवारी (21 सप्टेंबर) राज निवास येथे आयोजित एका साध्या कार्यक्रमात अतिशी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, यासह आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
त्यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. तर गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन हे देखील अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
तत्पूर्वी, 17 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी अबकारी धोरणाशी संबंधित एका प्रकरणात तिहार तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
आपचे ज्येष्ठ नेते आतिशी दिल्लीतील कालकाजी येथून आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्या शिक्षण, पीडब्ल्यूडी, वीज, पर्यटन, महिला आणि बालविकास आणि इतर अनेक खात्यांच्या मंत्री होत्या. त्या आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या सदस्याही आहेत. 2003 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर पदवी मिळवली.आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आहे.