Indira Gandhi international airport terminal 1 roof collapsed : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.(Delhi Airport News)
ANI :- दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. टर्मिनल-1 वर शुक्रवारी सकाळी विमानतळाचे छत कोसळले. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 6 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.
दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळले. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या अपघातानंतर सुरुवातीला चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आता जखमींची संख्या 6 झाली आहे. ताज्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. Indira Gandhi international airport terminal 1 roof collapsed
अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याचा फोन शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता त्यांना आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आतापर्यंत तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र एक जण अडकला होता. त्याचीही आता सुटका करण्यात आली आहे.
शुक्रवारी दिल्लीत मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस झाला. पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पावसाने दिल्ली भिजली. मात्र, त्यामुळे सकाळपासूनच शहरात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून लोकांना तिथे पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. Indira Gandhi international airport terminal 1 roof collapsed
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…