Delhi Airport : दिल्ली विमानतळावर अचानक बत्ती गुल… प्रवाशांचा गोंधळ उडाला
•Delhi Airport दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळाचे वातावरण होते. बॅकअप पॉवरमुळे परिस्थिती लवकरच सामान्य झाली.
ANI :- दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (17 जून) अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ग्रीड निकामी झाल्यामुळे दिल्ली विमानतळावर सुमारे दोन मिनिटे वीज गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅकअपमुळे तिकीट काउंटर आणि इतर सुविधा काही सेकंदातच सामान्य झाल्या.विमानतळाची एसी यंत्रणा बॅकअपवर येण्यासाठी सुमारे पाच मिनिटे लागली, त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जीएमआरच्या मते आता सर्व काही सामान्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिल्ली विमानतळावर दोन दिवसांचा पॉवर बॅकअप असतो.
आज दुपारच्या दीडच्या सुमारास आयजीआय विमानतळावर वीज गायब झाली. त्यामुळे चेक इन, तिकीट आणि इतर सुविधांवर बराच काळ परिणाम झाला. यावेळी विविध गोष्टींना विलंब झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.