
Eknath Shinde On Navi Mumbai Airport : ‘लवकरच लंडनचे लोक हिथ्रोची तुलना नवी मुंबई विमानतळाशी करतील’,’महाविकास आघाडीने लावलेले स्पीड ब्रेकर उखडून टाकले; पूरग्रस्तांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज’
नवी मुंबई :– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या Navi Mumbai Airport लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांचे कौतुक करत, मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या कामांचे श्रेय घेतले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, “देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांचं मी महाराष्ट्राच्या भूमीत स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो,” असे म्हणत केली.
‘मोदींच्या हातून सोनं होतं’
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या प्रकल्पांचा उल्लेख करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण करत असतो. आठ वर्षांपूर्वी ज्याचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं होतं, त्याचं आज लोकार्पण होतं आहे,” असे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “मोदींचा हात लागतो, त्या गोष्टीचं सोनं होतं हे आपण पाहतो.”
ते म्हणाले, “2014 मध्ये मोदींनी जो टेकऑफ केला आहे, तो भारताला महासत्ता करण्यासाठीच आहे. प्रगती आणि विकास बरोबर येतात. उड्डाण म्हटलं की आम्हाला मोदी आठवतात.”
‘लंडनचे लोक हिथ्रोची तुलना नवी मुंबईशी करतील’
नवी मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले. “मी आज आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो की, एअरपोर्टची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करत आहेत. पण लवकरच लंडनचे लोक हिथ्रोची तुलना नवी मुंबईशी करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी भुयारी मेट्रो प्रकल्पाचाही उल्लेख केला. “उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गाने दक्षिण मुंबईशी जोडणारी मेट्रो हे उत्तम उदाहरण आहे. दोन ते चार वर्षांत सगळ्या मेट्रो सुरु होतील. हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते,” असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीवर टीका
मागच्या सरकारवर टीका करताना शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीने समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इतर सगळ्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर लावले होते.” मात्र, “2025 मध्ये हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि त्यानंतर राज्याचा विकास होतो आहे,” असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी पॅकेज
शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटावर बोलताना त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पॅकेजचा उल्लेख केला. “आज आपला शेतकरी म्हणजेच बळीराजा संकटात आहे. या पूरग्रस्तांसाठी आपल्या सरकारने 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केला. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा शब्द आम्ही पाळला,” असे शिंदे म्हणाले.
‘नेशन फर्स्ट विरुद्ध करप्शन फर्स्ट’
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेल्या निधीची आकडेवारी देताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “2014 पर्यंत काँग्रेसने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटी दिले होते, मात्र मागच्या दहा वर्षांत मोदींनी 10 लाख कोटींचा निधी महाराष्ट्राला दिला,” असे ते म्हणाले. काँग्रेसचे ‘करप्शन फर्स्ट’ आणि मोदींचे ‘नेशन फर्स्ट’ हे आपण पाहिले आहे, असे सांगत “विकास की एकमेव आंधी इसका एकमेव कारण नरेंद्र मोदी” असे म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला.


