Yawat Selfie Point : शिक्षणाची आवड निर्माण करत आहेत शाळापूर्व तयारी मेळावे
( दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी )
Yawat Selfie Point News : – दौंड, ता. १७ यवत स्टेशन Yawat Station जिल्हा परिषद शाळेत सन २०२४-२५ या वर्षात इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढोल ताशा व लेझीम च्या गजारात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांची वजन, उंची यांचे मोजमाप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विकासाची माहिती देण्यासाठी विविध टेबलवर व्यवस्था करण्यात आली होती. Daund News
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, आदी विषयांवर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. उन्हाळी सुट्टी मध्ये मुलांकडून करून घ्यावयाच्या विविध कृती व उपक्रम यांची माहिती पालकांना देण्यात आली. शाळा गावचा अभिमान व शान असते. गावात जसे देवाचे मंदिर असते तसेच ज्ञान मंदिर असावे असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. शाळापूर्व तयारी मेळावा यशस्वी करण्यासाठी यवत स्टेशन शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री रायकर, शिक्षक रामहरी लावंड, अनिल हुंबे, संगीता टिळेकर, संगीता वाळके, अंगणवाडी सेविका उल्का दुनाखे, ढमढेरे ताई, रुपाली शेळके यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला. Daund News
सेल्फी पाॅईंट ठरला सर्वांचे आकर्षण, यावेळी तयार करण्यात आलेला सेल्फी पाॅईंट सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होता. सेल्फी पाॅईंट मध्ये फोटो काढून विद्यार्थी व पालक यांनी आनंद घेतला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…