Daund News : पञकार परिषदेतून वैशाली नागवडे यांचा रमेश थोरात यांना थेट इशारा ; महायुतीच्या कामाचे श्रेय घेऊ नका
[ कार्यकर्त्यांनी आमचे निरोपाची वाट न पाहता कामाला लागावे ]
दौंड, ता.११ राष्ट्रवादीचे पदाधिकारी समोरच्या उमेदवाराचे काम करत आहेत त्यांचे निलंबन केले जाईल. या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय रमेश थोरात यांचे कार्यकर्ते घेत आहेत. रमेश थोरात Ramesh Thorat यांच्यामुळे वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदचे सभापती पद मिळू शकले नाही. तर मलाही जिल्हा बँकेमध्ये संचालक पदाची संधी न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्तया वैशाली नागवडे यांनी केला. यावेळी वीरधवल जगदाळे म्हणाले की, मी रावणगाव येथे प्रचार सभेत सहभागी झालो होतो. यावेळी आमदार राहुल कुल यांनी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याची परतफेड म्हणून आम्ही आयुष्यात प्रथमच भाजपाचे काम करणार आहोत असे सांगितले. विरोधी पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते आमचाच गट मोठा असे म्हणत असतील तर त्यांनी निवडणुकीनिमित्त दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश का केला? हा आमचा प्रश्न आहे. आमचे एकेकाळाचे सहकारी आप्पासाहेब पवार यांच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी हिसकावला. Daund Vidhan Sabha Election 2024
गेल्या २ वर्षांमध्ये दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे २ वेळा विभाजन झाले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले रमेश थोरात हे पक्ष म्हणून नव्हे तर गट म्हणून बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल. विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते हे सोयीनुसार आमच्याबाबत अफवा पसरवत आहेत. ही बाब चुकीची आहे. आमच्या सोबत १२ हत्तीचे बळ असणारे नेते अजित पवार आहेत. त्यांचा आदेश शिरसंवाद्य मानून या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी आमदार राहुल कुल यांचे काम करणार आहेत. कार्यकर्त्यांनी आमचे निरोपाची वाट न पाहता आज पासून कामाला लागावे असे पञकार परिषदेतून स्पष्ट केले. यावेळी वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, नंदू पवार, अनिल साळवे, निखिल स्वामी, सुहास वाघमारे, आनंद बगाडे यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Daund Vidhan Sabha Election 2024