दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी, ता. २१ आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी मिळण्यासाठी मोठा संघर्ष व मेहनत असते. शिक्षकांनी त्यांच्या कामातुन भैरवनाथ विद्यालयाची एक ओळख मिळवून दिली आहे. यामुळे भैरवनाथ विद्यालयाकडे पाहण्याचा पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. म्हणूनच शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार रमेश थोरात यांनी काढले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय व गुणवत्ता संवर्धन अभियानात खुटबाव विद्यालयाचा प्रथम क्रमांक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात दुसरा क्रमांक आणि शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आयोजित या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे, सचिव सुर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात, मनोज थोरात, योगेश थोरात, प्राचार्य राजेंद्र जगताप सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की एकजुटीने कोणतेही काम केल्यास ते तडीस जाते. येथील शिक्षकांनी चांगले काम केल्याने विविध शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यालयाने आजपर्यंत केलेल्या कामाचे त्यांनी मोठ्या मनाने कौतुक केले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या एनएमएमएस परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत रिया विशाल महामुनी या विद्यार्थिनीला ओबीसी प्रवर्गात प्रतिवर्षी १२००० प्रमाणे चार वर्षांत ४८००० रुपये मिळणार आहेत. शिवाय तनिष्का शेलार, गायञी नातू, धनश्री रणदिवे, श्रमिका दोरगे, दिप्ती रणदिवे, अनिशा ढमढेरे, ऋतुजा राक्षे यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना उपशिक्षक हनुमंत थोरात, संतोष थोरात, राणी मांढरे, मनीषा निंबाळकर, वीणा ताडगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय पवार तर आभार शांताराम कदम यांनी मानले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…