Daund Breaking News : पाटलांच्या आशेवर बसणाऱ्यांना धक्का ! मराठा समाजाच्या भल्यासाठी शब्दही न काढणाऱ्यांचा पत्ता कट होणार
[ वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी सगळेच तयार, पाटील आपल्याला तिकीट देतील असा विश्वास वाटणाऱ्यांच्या झोपा उडाल्या ]
दौंड, ता. ५ मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांच्या नजरेत आपण भरावे यासाठी कथित राजकीय पुढाऱ्यांची चढाओढ सुरू झाली आहे. वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी अनेकजण तयार झाले असून, मराठा समाजाच्या भल्यासाठी कधी शब्दही न काढणारे आपणच कसे मराठा सेवक आहोत असे भासविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. माञ सामान्य मराठा समाज या सर्व गोष्टी जाणून असून, कोणाला समाजाप्रती तळमळ आहे आणि खोटा आव आणत आहे याची जाणीव आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या वर्षभर मराठा योध्दा मनोज जरांगे सातत्याने आंदोलन करीत आहेत. जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा मिळतो आहे. कधी नव्हे तो संबंध सामान्य मराठा एकञ आला असून खऱ्या अर्थाने मराठ्यांची ताकद आता दिसत आहे. जरांगे यांच्या एका शब्दावर मराठा समाज एकत्र येत असून, यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. तर दुसरीकडे या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी संधी साधू पुढारी आणि काही कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहेत. समाजासाठी कधी न बोलणारे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चमकोगिरी करीत आहेत. आपणच खरे मराठा सेवक आहोत असे भासविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः ची वाहवा करून घेण्यात येत आहे. ज्यांनी सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहवा केली आहे. त्यांनी खरेच मराठा समाजाच्या विकासासाठी, भल्यासाठी काही विशेष असे योगदान दिले आहे का ? आता सध्याची परिस्थिती पाहून म्हणजे मराठा समाजाची झालेली एकी लक्षात घेता त्यांचे मराठा प्रेम जागे झाले आहे. येत्या काही दिवसात विधानसभेसह इतरही निवडणुका लागणार आहे. केवळ त्याच दृष्टिकोनातून हे प्रेम आता उतू जात आहे. यातील अनेकांना यापूर्वी समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यावेळी त्यांना मराठा समाजासाठी काहीतरी करावे असे कधी वाटले नाही. Daund Vidhan Sabha Election Latest News
पुणे जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती विपरीत झाली आहे. एकतर महायुती, महाविकास आघाडी मधून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मराठा ओबीसी असा वाद अजूनही पेटलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर जर तिकीट मिळाले नाही तर जरांगे पाटील यांच्याकडून लढण्याची अनेकांची इच्छा आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी पाटलांची भेट घेतली आहे. पाटील आपल्याला तिकीट देतील असा अनेकांना विश्वास वाटतोय. मात्र पाटलांची भूमिका काल समोर आल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. कोणाकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष उभे राहू असे अनेकांनी ठरविले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात अपक्षांची संख्या वाढेल अशी शक्यता आहे. Daund Vidhan Sabha Election Latest News
सामाजिक व समाजाचे करत असलेले काम याचा विचार करून उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढण्याची तयारी आहे. याबाबत जरांगे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहणार असून मला उमेदवारी दिली नाही तरी ते जो उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवाराचे मी काम करणार. भविष्यात जरांगे यांचे नेतृत्वाखाली काम करीत राहणार. Daund Vidhan Sabha Election Latest News
वसंत साळुंखे, जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम
दौंड विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे जे उमेदवार देतील त्याचं काम आम्ही करु. दौंड विधानसभेसाठी ज्यांनी कोणी उत्सुकता दाखवली आहे, तो एक समाजाचा भाग समाजाचा घटक म्हणून त्यांनी उत्सुकता दाखवली असेल. मनोज जरांगे जो उमेदवार देतील त्यांचे काम आम्ही करु. Daund Vidhan Sabha Election Latest News
–राजाभाऊ कदम