दौंड तालुका प्रतिनिधी, हरिभाऊ बळी : ता. ९ राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाच्या ग्राहक संरक्षण समितीच्या दौंड तालुका अध्यक्षपदी संभाजी आत्माराम फडके कानगाव ( ता. दौंड ) यांची निवड करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या हस्ते व माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, बापूराव फडके, पुणे जिल्हा संघटक भाऊसाहेब फडके, ग्राहक संरक्षण समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कोंडे, ग्राहक समितीचे दौंड तालुका सरचिटणीस सोमनाथ ढमे यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी फडके यांची नियुक्ती करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे यांचा मंगळवारी दौंड दौरा आयोजित कार्यक्रमात संभाजी फडके यांची दौंड तालुका अध्यक्षपदी निवड केल्याचे पेञ देण्यात आले. संभाजी फडके गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या कामाची पद्धत पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुका अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…