क्राईम न्यूजपुणे
Trending

Daund News : मुरुम, माती तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला !

दौंड, ता. १० झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी मुरुम, माती तस्करी सुरू केली असून सध्या त्यांच्यावरही पुष्पाचे गारुड आहे. राञभर अवैधरित्या मुरुम मातीचा उपसा करून आपला नाद करायचा नाय, आमच्या वाट्याला जाल तर खबरदार, आपलं एकच काम भरा मुरुम माती, प्रशासनासमोर झुकेगा नही साला अशीच भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दौंड तालुक्यात दिसून येत आहे. दौंड तालुक्यात सर्वत्र मुरुम मातीचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. शासनाच्या मालमत्तेची लेट होत असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. daund latest crime News
दौंड तालुक्यात मुरुम, माती तस्करीतील पुष्पाला रोखणार कोण ? असा सवाल जनसामान्यांतून उमटू लागला आहे. मुरुम मातीचा अवैधरित्या बेसुमार उपसा करून हायवा, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक केली जात आहे. राञीला होत असलेल्या मुरुम माती चोरीला लगाम लावण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुरुम माती तस्कर या धंद्यावर रग्गड कमाईतून गब्बर झाल्याने अनेकांच्या अंगावर ते राञीला धावून येत आहेत. तालुक्यातील मुरुम माती तस्कर मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मुरुम माती चोरी करून भरधाव वेगाने वाहने हैदोस घालत आहेत.
मुरुम माती तस्करांचा अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होत आहेत. मुरुम मातीने भरलेले हायवा, डंपर, ट्रॅक्टर भरदिवसा यंञणेच्या नाकावर टिच्चून वावरत आहेत. कोणी तक्रार केली किंवा वरिष्ठांनी आदेश दिले तर नावापुरती कारवाई केली जाते. दौंड तालुक्यात काही ठिकाणी अवैध मुरुम मातीच्या ओव्हरलोड हायवा ट्रॅक्टरमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0