Daund News : सर्वांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
[ पंचक्रोशीतील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा ; आ. राहुल कुल यांचे आवाहन ]
समर्थ भारत वृत्तसेवा, यवत, ता. १६ आरोग्य सेवा देणे आणि गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हिच खरी सेवा असल्याने १९ सप्टेंबर रोजी आमदार राहुल कुल Rahul Kul यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी ( चौफुला ) ता. दौंड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील नागरिक, रुग्ण यांनी या महाआरोग्य शिबिराच्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राहुल कुल यांनी केले आहे. Daund Latest News
या उपक्रमाचे लाभ पासून गरजू रुग्ण वंचित राहू नये. शस्त्रक्रिया आणि उपचार आरोग्य सेवेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत अशी माहिती आ. राहुल कुल यांनी दिली. कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Daund Latest News