पुणे

Daund News : सरपंच होण्याची नाही लायकी…. स्वप्न माञ आमदारकीचे !

[ दौंडला आता नवश्या आमदार मिळणार ; दौंड विधानसभेचा विकास करुन पांग कोण फेडणार ]

दौंड, ता. २० जवा बघतीस तु माझ्या कड्… मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अशा आयशाचं गीत मागील काही वर्षात डि.जे.ला. धुमाकूळ घालत आहे. अगदी या गिताच्या बोलाप्रमाणेच दौंड विधानसभेत हवश्या नवश्यांना आता आमदार झाल्याचं स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे. दौंड तालुका तसे पाहता राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारा तालुका आहे. या तालुक्यात अनेक मातब्बर नेते होऊन गेले ज्यांनी राज्यात आपल्या राजकीय कारकिर्दीत दौंडचे नाव अधोरेखित केले. दौंडचा विकास किती झाला ? किती केला? हा जरी संशोधनाचा विषय असला तरीही राजकीय क्षेत्रात दौंडचे नाव आहे. हे नाकारता येत नाही.

आगामी विधानसभेत तर भलतच चित्र खास करून दौंड विधानसभेत बघायला मिळत आहे. ज्या व्यक्तीची साधा सरपंच होण्याची सुद्धा कुवत नाही असे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले दिसत आहेत. माझ्या मागे माझ्या समाजातील ईतके मतदान आहे, माझ्या मागे अमुक नेत्याचा आशीर्वाद आहे, मी म्हणजे उगवते नेतृत्व, जनमताचा कौल फक्त माझ्या पाठीशी आहे. दौंड मतदार संघात फक्त माझ्याच नावाची जोरदार चर्चा आहे. अमूक पक्षाचा उमेदवार म्हणून मीच दावेदार आहे. अमूक हवश्या व्यक्तीने तमुक गवश्या पक्षात प्रवेश केल्याने आता दौंडला नवश्या आमदार भेटणार.
दर पाच वर्षाला आमदार होण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येऊन आश्वासनांची खैरात वाटतात. अमुक करु, तमुक करु, अमुक विकास करु, तमुक विकासाची गंगा या मतदार संघात आणु पण पुन्हा पाच वर्षे हेच सगळे कोणत्या बिळात गायब होतात ते समजत नाही. निवडणूक दिलेला आमदार तर पुन्हा पाच वर्षांनीच गलेलठ्ठ झालेला बघायला मिळतो.

निवडणुन दिल्यानंतर माञ तो मुंगसा मुंगसा तोंड दाखव म्हटलं तरी दाखवत नाही. आज दौंड विधानसभा क्षेञात लाखो प्रश्न जैशे ते च आहेत. सध्या हवशे, गवशे, नवसे उमेदवार तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी या दौंड विधानसभेचा विकास करुन कोण पांग फेडणार हा प्रश्नच आहे ?
अमक्या भागात विकास केला, भेट देऊन मदत केली, तमक्या आंदोलनाला पाठिंबा दिला अशा आशयाच्या बातम्या देखील आता अधुन मधुन झळकवायला सुरुवात झाली आहे. सोबतीला चार टकुचै घेऊन हाॅटेलवर बसुन दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या काही ओळखीच्या लोकांना चहापाणी, बिडी, सिगारेट, गुटखा, सुपारी वाटत मी आता भावी आमदार आहे. तुमच्या किंवा तुमच्या भागातील समस्या मीच सोडवू शकतो , दौंड विधानसभा क्षेञाचा विकास मीच कसा करु शकतो हे पटवून सांगताना हे भावी आमदार दिसून येतात. व्हाट्सअपचा ग्रुप उघडून बळचच ओळखी पाळखीचे लोकं या ग्रुपमध्ये कोंबायचे आणि मग मीच तुमचा भाग्यविधाता कसा आहे हे पटवून सांगणार्या पोस्ट या व्हाट्सअप गुर्पवर रंगवून सोडायचा धंदा सुद्धा सध्या तेजीत सुरू आहे.

दिवसभर पांढरेशुभ्र कपडे परिधान करून आणि चारचाकी आलीशान गाडीने अमुक तमुक भागाचा दौरा, भेट, लग्नात आशिर्वाद, मयतीला उपस्थितीती , वाढदिवस साजरा, आंदोलनाला भेट, पक्षाचा नेता आला तर नेत्याच्या मागे साहेब साहेब आमचे साहेब म्हणुन लाळघोटे पणा करुन आणि बॅंनरबाजी करुन आलेल्या पक्षीय नेत्याचा उदोउदो करून मीच कसा योग्य उमेदवार हे दाखवून देण्याचा प्रयत्न करताना हा हवश्या दिसुन येतो.
आणि दिवस मावळला कि मग हे भावी आमदार आणि त्याचे चार टकूचै राञी एखाद्या ढाब्यावर बसुन दिवसभराचा क्षीण घालवत आमदारकीचे स्वप्न रंगवत आणी मदीरेच्या झींग चढवत गाणं म्हणत नाचतांना दिसतात. आणी गाणं सुरु असतं..जवा बघतीस तु माझ्या कड्.. मला आमदार झाल्या सारखं वाटतय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0