[ आश्वासनाची पूर्तता करावी, निवेदनातून आंदोलनाचा इशारा ]
दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी
ता. १७ पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या महागाई विरोधात ( १७ एप्रिल रोजी ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्ष तर्फे दौंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. Daund Sharad Pawar Group शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करु असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅलर ६५.४१ डाॅलर आले आहेत. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किमती प्रति बॅलर ६४.४० डाॅलर होती. या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे. रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर १५ ते १६ आणि डिझेलवर प्रति लिटर ६.१२ रुपये नफा कमवत आहेत. असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल किमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढवून जनतेचे पैसे लुटत आहेत. असा संताप यावेळी व्यक्त केला. महागाईचा आगडोंब उसळला असून बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न जनतेला पडलाय. दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जनतेची लूट थांबवावी आणि महागाई कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती, तथा दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष सचिन काळभोर, शहर अध्यक्ष सचिन गायकवाड, चैतन्य पाटोळे, श्रेयस सोनवणे, पंकज नांदखिले, अमित पवार, सूरज भुजबळ, किशोर टेकवडे, हर्षद पटेल, विकी पवार यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत..... Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…