पुणे

Daund News : वाढत्या महागाई विरोधात NCP शरद पवार गटातर्फे दौंड तहसीलदार यांना निवेदन

आश्वासनाची पूर्तता करावी, निवेदनातून आंदोलनाचा इशारा

दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी
ता. १७ पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या महागाई विरोधात ( १७ एप्रिल रोजी ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्ष तर्फे दौंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करु असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅलर ६५.४१ डाॅलर आले आहेत. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किमती प्रति बॅलर ६४.४० डाॅलर होती. या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे. रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर १५ ते १६ आणि डिझेलवर प्रति लिटर ६.१२ रुपये नफा कमवत आहेत. असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल किमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढवून जनतेचे पैसे लुटत आहेत. असा संताप यावेळी व्यक्त केला. महागाईचा आगडोंब उसळला असून बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न जनतेला पडलाय. दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जनतेची लूट थांबवावी आणि महागाई कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती, तथा दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष सचिन काळभोर, शहर अध्यक्ष सचिन गायकवाड, चैतन्य पाटोळे, श्रेयस सोनवणे, पंकज नांदखिले, अमित पवार, सूरज भुजबळ, किशोर टेकवडे, हर्षद पटेल, विकी पवार यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत…..

  • पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती कमी कराव्यात.
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
  • सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मिळणारा हप्ता वाढवावा.
  • शेतकऱ्यांची वीज खंडित न करता संपूर्ण वीज बिल माफ करावे.
  • शेतकऱ्यांची महा डिबिटी तसेच अन्य योजनेतील एक वर्षापासून थांबलेल अनुदान रक्कम तात्काळ देण्यात यावे. शासनाने ही आश्वासने पूर्ण करावीत तसेच महागाई आटोक्यात आणून सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वसनाप्रमाणे मदत करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago