Daund News : मुस्लिम मावळा खलिल शेख यांनी केली प्रचंड उत्सवात शिवजयंती
[ उरुळी कांचन मधील शिवजयंतीला घडले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन ]
Daund News :– दौंड, ता. ३० छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान म्हणजे शिवनेरी जुन्नर. खलिल शेख Khalil Sheikh यांनी उरुळी कांचन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुस्लिम समाजाच्या समवेत अतिशय उत्साही आणि दिमाखदार पद्धतीने साजरी केली. यावर्षी तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती २८ मार्चला साजरी केली. यंदा त्यांच हे ११ वर्ष असून दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे अतिशय उत्साही आणि दिमाखदार पद्धतीने साजरी केली. छञपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती – धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांच्या या स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे देखील महत्वाचे योगदान आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे क्षमतावादी व सर्वांना न्याय देणारे होते. दर्यासारंग दौलत खान, इब्राहिम खान, रुस्तुमेजमान, सिध्दी हिलाल, मदारी मेहतर इत्यादी मुस्लिम मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेले आहे. छञपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षका पासून ते खाजगी सचीवा पर्यंत सर्व विश्वासु मुस्लिम मावळे होते. आज खऱ्याअर्थाने देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची आवश्यकता आहे. Daund News
खलिल शेख म्हणाले की छञपती शिवाजी महाराजांनी स्वराजात जनता इतकी सुखी आणि प्रशासन इतके मजबूत होते, कि कोणताही अपराध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. आम्ही गेल्या ११ वर्षापासून शिवजयंती उत्सव आम्ही सातत्याने साजरा करीत असून शिवाजी महाराजांचा इतिहास मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहोत. याला चांगला प्रतिसाद मिळत असून पुढेही शिवजयंती अशीच साजरी होणार असल्याचे खलिल शेख यांनी सांगितले. Daund News
या सोहळ्यास इतिहास अभ्यासक महेंद्र नवले, येसाजी कंकांचे वंशज विकास कंक, रविंद्र कंक, सरदार शिळिमकरांचे वंशज मंगेश शिळिमकर, मुकुंद पायगुडे, योगेश खोपडे, सुनिल काकडे, खुशाल कुंजीर, राजेश कुंजीर, सुनिल तुपे, बाळकृष्ण काकडे, शोयेबभाई मणियार, काळुराम मेमाणे, माजी सरपंच सह गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Daund News