Daund News : दौंड पोलीस स्टेशनसाठी सक्षम कर्तव्यदक्ष अधिकारी नाही का ? ते कर्मचारी, अधिकारी जावई आहेत का ?
दौंड, ता. ६ दौंड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अचानक बदली झाल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर इतर कर्मचारी, अधिकारी एका ठिकाणी अनेक वर्षांपासून असल्याने हे कर्मचारी वरीष्ठां चे जावई आहेत का ? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. तसेच वांरवार अधिकारी बदली होण्यामागे कुंपनच शेत खात नाही ना ? याचा सखोल तपास वरीष्ठांनी करावा असे मत सर्व सामान्य जनमानसातुन उमटत आहे. Daund News
३० दिवसात चंद्रशेखर यादव हे सर्व सामान्या मध्ये नाव लौकिक झाले. यादव यांनी कठोर भूमिका घेत शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास निर्माण करून दिला तसेच वाहतुकीची कोंडी मोडीत काढल्याने आणि स्वयंशिस्त लावून दिल्याने सर्व सामान्य नागरिक यादव साहेबांच्या कार्यावर समाधानी झाले. दौंड पोलीस स्टेशनला येणारा प्रत्येक पीडीत, नागरिक यांच्या समस्या समजुन घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वांमध्ये आपुलकीने स्थान निर्माण केले. चंद्रशेखर यादव यांनी पोलीस स्टेशन मध्ये होणारा राजकीय सामाजिक वरदहस्त मोडीत काढले, यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असतात मात्र यादव यांची अचानक बदली केल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि घडवलेले प्रसंग बघता कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे कुपंनच तर शेत खात नाही ना ? असा प्रश्न नागरीकांमधुन उपस्थित केला जात आहे. Daund News
पोलीस विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी नाही का ? वरिष्ठां याची मिमांसा करण्या ऐवजी सरळ बदली करीत असल्याने जाणार्या अधिकार्यांच्या कार्यावर संशय व्यक्त होत असल्याने पोलीस अधिक्षकांकडे दौंड पोलीस स्टेशनसाठी एकही कर्तव्य दक्ष अधिकारी नाही का ? जो कार्यकाळ पूर्ण करेल ? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांमधुन उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बंदल्यांनी दौंड पोलीस स्टेशन सध्या चर्चेत आहे. वारंवार अधिकारी बदल्याने पोलीस दलाची नाचक्की होत असली तरी सर्व सामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यां पेक्षा वरीष्ठ अधिकारीच सक्षम आहेत की नाही ? याबद्दल शंका उपस्थित होत आहेत. दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य बजावलेल्या काही कर्मचारी अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली असता असे समोर आले आहे की चोर सोडुन संन्याशाला फाशी का ? असा प्रश्न उपस्थित होतो. अधिकारी जड व्हायला लागल्या वर स्थानिक वरद हस्त वापरून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. काही अधिकारी कर्मचारी यांच्या तक्रारी असून सुद्धा कोणतीही कारवाई अद्याप ही झालेली नाही. माञ अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेचच होतात, मग ते कर्मचारी, अधिकारी जावई आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांची वारंवार बदली करून पोलीस दलाची होणारी नाचक्की ओढवून घेण्यापेक्षा सखोल चौकशी करण्याचे मत सुज्ञ नागरीकांमधुन व्यक्त होत आहे. Daund News