Daund News : यवत येथे शाळा क्रमांक १ व २ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Ambedkar Jayanti : दौंड, ता. १५ यवत येथील जिल्हा परिषद Yavat ZP School 1 And 2 शाळा क्रमांक १ व शाळा क्रमांक २ विद्या विकास मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Ambedkar Jayanti यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मानवाला – माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव – भारतरत्न, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यवत ता. दौंड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व शाळा क्रमांक २ विद्या विकास मंदिर येथे मोठ्या उत्साहात प्रतिमा पूजन व बुध्द वंदना म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, शाळा २ चे मुख्याध्यापक छाया काळे, शिक्षक मल्लीनाथ शिंगे, प्रशांत शितोळे, गणेश खेडेकर, रविंद्र तांबट, सुमित्रा डावरे, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.